सेलू शहरातील देशपांडे लेआऊट परिसरात अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुरुवारी (ता. ११) दुपारी धाड टाकून विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत १२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सुनील नंदजी अरबट (वय ४२, रा. देशपांडे लेआऊट, वॉर्ड क्र. ३, सेलू) यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दुपारी १.४५ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.