राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ (सी) वरील वडसा-साकोली रोडवर असलेल्या एका दुकानात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून रोख रकमेसह बॅटरी व सुटे भाग असा एकूण ६७ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी रूपेश विनायक पिंपळकर (२८, रा. लाखांदूर) यांचे गोपाल हटवार यांच्या घरी भाड्याने घेतलेल्या रूममध्ये दुकान असून, दि. २० डिसेंबर रोजी सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले असता ही घटना घडली.