समुद्रपूर: जाम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा मार्ग मोकळा:वैद्यकीय विभागाला आमदार कुणावार यांच्याहस्ते ७/१२ सुपूर्द
समुद्रपूर: तालुक्यातील जाम येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा मार्ग मोकळा झाला असून मुंबई येथे आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम येथील जागेचा सातबारा त्यांच्याकडे सुपूर्द केला वैद्यकीय महाविद्यालयाची जाम येथील जागा हि कृषी विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याकरीता आमदार कुणावार यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता त्याचं अनुषंगाने आता जागेचा मार्ग मोकळा झाला आहे.