परभणी तालुक्यातील सावंगी खुर्द शेत शिवारामध्ये रोही वन्य प्राण्यांचा शेतीमध्ये उच्छाद वाढत चालला आहे. रोही हे प्राणी हिंसक जरी नसले तरी नुकतंच उगत असलेलं गहू ,ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नासधुस करत असल्याने शेतकरी हताश झाले आहेत, वन विभागाने शेतीमध्ये नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आज रविवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता केली आहे.