महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचे वाभाडे निघत असून औसा शहरांमध्ये तीन दिवसापासून महावितरणच्या कारभाराचा सावळा गोंधळ सुरू असल्याने शहरात अधून मधून सातत्याने विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळी प्रखर उन्हाची तीव्रता असताना तसेच शासकीय कार्यालय, बँका, व्यापारी आस्थापना व उद्योग व्यवसायिकांना आणि घरगुती विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना तीन दिवसा पासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.