रांजणगाव एमआयडीसीः शिरुर तालुक्यातील पिकअप वाहनांचे टायर चोरणाऱ्या चार आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात आरोपी अक्षय रूस्तुम राठोड, तुषार लक्ष्मणराव दामेकर, करण सुभाष राठोड आणि सुनिल गंगाधर भोसले यांनी चोरी केलेल्या १४ टायरसह गुन्ह्यात वापरलेली इरटीगा कार पोलिसांच्या ताब्यात आली. एकूण १०,००,०००/- रूपयांच्या मुद्देमालाची जप्ती केलाय.