वणी: नगरपरिषद निवडणुकीत 8उमेदवारांची माघार तर एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी अर्ज घेतला मागे, निवडणूक विभागाची माहिती
Wani, Yavatmal | Nov 21, 2025 आज शुक्रवारी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. आज 8 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. यात प्रभाग 4 मधून सर्वाधिक 3 अर्ज मागे घेण्यात आले तर प्रभाग क्रमांक 9 ब मधून दोघांनी माघार घेतली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या एका उमेदवारांनी देखील अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 150 पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत