गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीतील कवलेवाडा येथील बावनथडी नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन करणारे दोन ट्रॅक्टर व एक लोडर असा एकूण 46 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल गोबरवाही पोलिसांनी दि. 15 जानेवारी रोज गुरुवारला सायं.6 वाजताच्या सुमारास जप्त केला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक-मालक सुनील ताराचंद पुराम व लकी देवदास पाचे यांच्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.