चाळीसगाव: गेल्या महिन्यात पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनंतर आता सर्वांचे लक्ष उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लागले आहे. येत्या मंगळवारी, १३ जानेवारी रोजी चाळीसगाव पालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासह चार स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, राजकीय वर्तुळात गलिच्छ हालचालींना वेग आला आहे.