साकोली तालुक्यातील कुंभली येथील दुर्गाबाईच्या डोहावर संक्रांतीच्या निमित्ताने यात्रेत नागरिकांनी मोठी गर्दी केली असून गुरुवार दि15 जानेवारीला दुपारी बारा वाजता पर्यंत पन्नास हजार पेक्षा अधिक भाविकांनी या यात्रेत देवीचे दर्शन घेतले आहे.जीवनोपयोगी वस्तू,खेळणे,दगडी वस्तू, शेतोपयोगी वस्तू या दुकानांची रेलचेल असून करोडो रुपयांची उलाढाल या यात्रेत होणार आहे. आमदार नानाभाऊ पटोले यांनी देखील यात्रेत सहभागी होऊन देवीचे दर्शन घेतले यात्रेत शांतता व सुव्यवस्थेसाठी साकोली पोलीस प्रशासन सज्ज आहे