गोठणगाव येथे आरोग्य शिबिराचा परिसरातील सुमारे २४० गरजवंत नागरिकांनी लाभ घेतला. तपासणीनंतर ५७ रुग्णांना पुढील उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल, नागपूर येथे पाठविण्याची शिफारस करण्यात आली होती. यापैकी ४८ रुग्ण स्वेच्छेने उपचारासाठी तयार झाल्याने, आज दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी मेघे हॉस्पिटलची बस बोलावून सर्व रुग्णांना निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले.