ग्रामीण भागात असलेल्या कुजबा-भोरदेव शिवारात वाघाने 2 जनावरांची शिकार केल्याची घटना उघडकीस आली याबाबत चे वृत्त असे की कुजबा येथील गोपालक श्रीखंड रामचंद्र भगत यांची 1 गाय व भोरदेव येथील गोपालक शामु डोमजी पाचबुद्धे यांची 1 गाय असे 2 गायींची शिकार वाघाने केली .या घटनेत गोपालकांचे अंदाजे 90 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली .त्यावरून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात आला.