तालुक्यातील बाभूळतेल येथे घरात साठवून ठेवलेल्या कापसाला अचानक आग लागल्याने या घटनेत 15 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील बाभूळतेल येथील रहिवासी किशोर गोपीनाथ महाले यांनी कापूस हा घरात साठवून ठेवला होता अचानक या कापसाला आग लागली.या घटनेत 15 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.यासोबतच घरातील संसारऊपयोगी साधनेही जाळून खाक झाली आहे.प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.