हवेली: भोसरी MIDC मध्ये LPG सिलेंडरचा भीषण स्फोट
Haveli, Pune | Nov 29, 2025 भोसरी MIDC परिसरात LPG सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत कंपनीतील एक-दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट टी-50 ब्लॉकमध्ये झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. जखमी कामगारांना तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवले गेले आहे.