जावळी: शासनाच्या विविध परवानग्यांअभावी मुनावळे जलपर्यटन प्रकल्प रखडला:सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे
Jaoli, Satara | Sep 22, 2025 कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर मुनावळे (ता.जावली) या ठिकाणी १०.११ हेक्टर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जल पर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केले होते.मात्र विविध परवानग्या आभावी रखडला आहे, अशी माहिती सोमवारी दुपारी 4 वाजता सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिली.