जालना येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. करुणा अच्युत मोरे यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार 2025 हा पालकमंत्री आणि इतर मान्यवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने मंगळवार दि. 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता शाहिरी प्रशिक्षण शिबीराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या महत्वपुर्ण कार्याबद्दल सौ. करुणा अच्युत मोरे यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.