निफाड: निफाड साखर कारखाना कामगारांचा जिल्हा बँक प्रशासनाला निर्वाणीचा इशारा, भाऊसाहेबनगर येथे कामगार आणि सभासदांकडून निदर्शने
Niphad, Nashik | Aug 8, 2025 निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा डाव जिल्हा बँकेने आखला असून जोपर्यंत कामगारांचे 81 कोटी 94 लाख रुपये देणे, आणि सभासदांच्या ठेवी मिळत नाही तोपर्यंत हा कारखाना विक्री करू देणार नाही, निफाड कारखाना हा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या सभासदाच्या आणि कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे, त्याला असा गिळंकृत होऊ देणार नाही, असं निर्वाणीचा इशारा आज दिनांक आठ रोजी दुपारी एक वाजता निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांनी जिल्हा बँक व प्रशासनाला भाऊसाहेब नगर येथे दिला आहे व निदर्शने केली आहेत.