इंदापूर: शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूरातील भाग्यश्री बंगलोवर सपत्नीक घेणार हर्षवर्धन पाटलांची भेट
Indapur, Pune | Apr 17, 2024 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार,पार्थ पवार आणि जय पवार हे शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भाजपचे जेष्ट नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातील भाग्यश्री बंगलो या निवासस्थानी भेटीसाठी येणार असल्याची माहिती नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक भाजपा युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.