चोपडा: गरताळ या गावात पाण्याच्या हौदात बुडून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू, चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | Nov 16, 2025 चोपडा तालुक्यात गरताळ ही गाव आहे. या गावात अश्विन रमेश बारीला वय ०२ हा बालक आपल्या घराच्या बाहेर खेळत होता दरम्यान तो खेळता खेळता पाण्याच्या हौदात बुडाला. हा प्रकार निदर्शनात येताच त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा या ठिकाणी नेण्यात आले तेथे डॉक्टर आणि तपासणी करून त्याला मयत घोषित केले. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.