आज दिनांक 24 डिसेंबरला नेर तालुका पत्रकार संघाच्या वतीने नेर नगर परिषद चे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनीताताई जयस्वाल व नगरसेवक पवन जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटमासे,लोकमतचे किशोर भाऊ वंजारी देशोन्नतीचे निलेशभाऊ वाहने, लोकमत समाचार चे निलेशभाऊ वंजारी, सकाळचे प्रा.सदाशिव नरोटे,गणेश भाऊ राऊत लोकसूत्राचे गुलाब भाई खान,प्रा उदय जी कानतोडे अरुणभाऊ राऊत,उमेशभाऊ इंगोले यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.