परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात गोंदिया शहरात सुरू असलेल्या हनुमंत कथा महोत्सवाच्या पर्वानिमित्त आज पिंडकेपार येथील प्राचीन श्रीकृष्ण गौरक्षण सभेच्या गौशाळेला भेट दिली. यावेळी ऋतेश्वरजी महाराजांसह गौमातेचे खासदार प्रफुल भाई पटेल यांनी मनोभावे पूजन केले. याप्रसंगी श्रीकृष्ण गौरक्षण सभेचे अध्यक्ष श्री.शंकरलाल अग्रवाल व समस्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने परमपूज्य सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराजांसह सर्वांचा आत्मीयतापूर्वक सत्कार करण्यात आला.