परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ गोरेगाव घोटीच्या वतीने मानवधर्माचे भव्य सेवक संमेलन गोरेगाव शहरातील आठवडी बाजाराच्या पटांगणावर दि.21 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.त्या दिशेने दि.20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घोटी येथे श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मानवधर्माचे भव्य सेवक संमेलनानिमित्त मानवधर्माची भव्य शोभायात्रा 21 डिसेंबरला सकाळी 8 वाजता घोटीवरून काढण्यात येणार आहे.त्या दिशेने परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.