मावळात निर्भया अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा समाजासह सर्व समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या 'मावळ बंद'ला पवन मावळच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला.चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.