हिंगणघाट: व सिंदी रेल्वे या दोन्ही ठिकाणी नगरपरिषदेत भाजपच्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल आमदार कुणावार यांनी मानले जनतेचे आभार
हिंगणघाट' आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात भाजपाने हिंगणघाट व सिंदी रेल्वे नगरपरिषदेची निवडणूक लढवली होती. कुणावार यांनी संपूर्ण निवडणूक जबाबदारी स्वताच्या खांद्यावर घेऊन लढवली यामध्ये हिंगणघाट मधून विदर्भात सर्वाधिक मताधिक्याने डॉ नयना तुळसकर नगराध्यक्ष म्हणून तर ४०पैकी ३० नगरसेवक निवडून आले तर सिंदी रेल्वे येथे स्नेहल स्नेहल कलोडे नगराध्यक्ष तर२०पैकी१०नगरसेवक निवडून आले.हा भाजपसाठी मोठा विजय ठरला असून त्यांनी दोन्ही ठिकाणच्या जनतेचे आ.कुणावार यांनी मुक्तकंठाने आभार व्यक्त केले