हवेली: वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील वाहतुक कोंडी संदर्भात औंध येथे पीएमआरडीएची आढावा बैठक संपन्न
Haveli, Pune | Nov 27, 2025 वाघोली आणि शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी निर्णायक पाऊल पीएमआरडीए उचलणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी महसूल, वाहतूक, एमआयडीसी, महामार्ग प्राधिकरण, मेट्रो तसेच संबंधित विभागांसह विस्तृत आढावा बैठक पीएमआरडीए कार्यालयात घेतली.