पाचोरा शहरातील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात आज गुरुवार दि. ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता माजी विद्यार्थी संघाची सह विचार सभा संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक राजेंद्र चिंचोले हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाइस चेअरमन विलास जोशी हे होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.