मनमाडमध्ये नायलॉन मांजामुळे महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आल्याने नायलॉन मांजाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.स्त्री रोग तज्ञ असलेल्या डॉक्टर विद्या योगेश मगर नेहमी प्रमाणे दुचाकीवरून क्लिनिकमध्ये जात असताना ईदगाह भागातील पुलावर अचानक नायलॉन मांजा चेहऱ्यावर आल्या त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळा बचावला तर चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या यासंदर्भात मनमाड डॉक्टर असोशियन ने मनमाड पालिकेच्या मुख्याधिकारी निवेदन देऊन मांजा विक्री करणाऱ्या कारवाई करण्याची मागणी केली