कोपरगाव नगरपरिषद निवडणुकिसाठी प्रचार शिगेला पोहोचला असताना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नगराध्यक्ष पदासह सदस्यपदासाठी अपील दाखल असलेल्या ठिकाणी निवडणुका स्थगित करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे विरोधकांच्या भूमिकेमुळे कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप करत काळे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोल्हे गटाने आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी 11 वाजता निषेध केला.