हिंगणघाट:२१ डिसेंबरला लागलेल्या हिंगणघाट व सिंदी रेल्वे नगरपरिषदेत आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन केले.यावर बोलताना आमदार कुणावार म्हणाले की या निवडणुकीत मतदारांनी विकासकडे पाहून मतदारांनी माझ्यावर मोठा विश्वास हिंगणघाट येथे १ नगराध्यक्ष ३० नगरसेवक सिंदी रेल्वे येथे १ नगराध्यक्ष आणि १० नगरसेवकांना निवडून दिले हा विजय माझा नसुन जनतेचा आहे मी जनतेला समर्पित करतो असे मत आमदार समिरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले.