ग्रामीण भागात असलेल्या मौजा पारडी येथे आपत्ती व्यवस्थापन च्या वतीने स्वयंमसेवक व गावकऱ्यांना आग कशी विझवावी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले .याबाबत चे वृत्त असे की आपत्ती व्यवस्थापन च्या वतीने मौजा पारडी अग्निशमन प्रशिक्षण देण्यात आले .यावेळी प्रात्यक्षिक करून दाखवून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .सोनू मेश्राम यांनी गावकऱ्यांना आग लागल्यास आग कशी विझवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी गावकरी उपस्थित होते.