नांदुरा: चॉकलेट देऊन महिलेला केली शरीर सुखाच्या मागणी;सावरगाव येथील घटना
सावरगाव नेहुयेथील 28 वर्षीय विवाहितेचा चॉकलेट देऊन शरीर सुखाची मागणी करून विनयभंग केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिनांक 21 नोव्हेंबर रोजी नांदुरा पोलिसात आरोपी रामदास धनु बोरसे राहणार सावरगाव नेहु तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आरोपी रामदास बोरसे यांनी पीडितेचा उजवा हात धरून व तिला चॉकलेट देऊन शरीर सुखाचे मागणी केली.