धुळे: माजी आमदार फारुक शहांच्या हस्ते चाळीसगावरोड अलखैर शाळेजवळ वॉल कंपाऊंड कामाचा शुभारंभ; नागरिकांच्या मागणीला यश
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळेतील चाळीसगाव रोड प्रभाग 19 मधील नागरिकांच्या मागणीनुसार अलखैर शाळेजवळ वॉल कंपाऊंडच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार फारुक शहा यांच्या हस्ते झाला. मुलांच्या सुरक्षेसाठी आणि खेळासाठी सुरक्षित जागेची गरज ओळखून शहा यांनी हे काम मंजूर केले. या संरक्षक भिंतीमुळे मुलांना खेळण्यासाठी मोकळे मैदान मिळणार असून पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.