जामनेर: वाकोदजवळ कार दुभाजकावर आदळली, गर्भवतीचा होरपळून मृत्यू
Jamner, Jalgaon | Nov 11, 2025 जामनेर तालुक्यातील वाकेद येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव कार दुभाजकाला आदळल्यानंतर आगीचा भडका उडाला. यात अवघ्या २१ वर्षाच्या सहा महिन्यांच्या गर्भवतीचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. तर पती गंभीर भाजला गेल्याची घटना घडल्याची माहिती दि. ११ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलिसांनी दिली.