गोंदिया: जिल्ह्यात सहलींसाठी लालपरी; खासगी बस नेल्यास कारवाई,५० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक
Gondiya, Gondia | Dec 23, 2025 शालेय सहल नेणाऱ्या स्कूलबस किंवा खासगी वाहनांवर कारवाईचे आदेश राज्याच्या सहायक परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे शाळांच्या सहली आता एसटी बसनेच कराव्या लागणार आहेत. ५० विद्यार्थ्यांमागे शिक्षक तर, विद्यार्थिनींसोबत शिक्षिका असणे बंधनकारक असेल.सरकारी निर्णयात शाळांनी सहलीसाठी सरकारच्या एसटीलाच प्राधान्य द्यावे हा नियम आहे. परिवहन विभागाच्या आदेशाने आता स्कूलबस किंवा खासगी वा