हिंगणघाट: वणा नदीच्या तीरावरील पवित्र 'श्री संत गाडगेबाबा नामसमाधी स्थळावर' पुण्यतिथी उत्सवाला आज सुरुवात झाली असून याठिकाणी २८ डिसेंबर पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.यावेळी"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. या मंत्राने जनमानसात स्वच्छतेचा आणि माणुसकीचा विचार रुजवणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वणा नदी तीरावरील नामसमाधी स्थळास भाविकांनी बाबांच्या पवित्र विचारांनाह प्रणाम केला.सात दिवस चालणाऱ्या या महोत्सव रोज विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.