चाळीसगाव: नगरपरिषद निवडणुकीत विजय-पराजय होतच असतो, मात्र पराभवाने खचून न जाता जनसेवेचा व्रत सुरूच ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय चाळीसगावच्या पराभूत उमेदवारांनी घेतला आहे. मतदारांच्या कौलाचा आदर करत प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आता प्रत्येक प्रभागात 'प्रतिनगरसेवक' कार्यरत राहणार असून, 'प्रतिनगरपालिकेच्या' माध्यमातून प्रशासनावर वचक ठेवला जाणार आहे.