पवनचक्की विरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक , जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल
Dharashiv, Dharavshiv | Sep 17, 2025
वाशी तालुक्यातील पवनचक्की बाधित शेतकऱ्यांनी बुधवारी (दि. 17) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंपन्यांकडून सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. तसेच नियमानुसार मोबदला देण्यासह विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.