हिंगणघाट: कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांची कारवाई; १३ हजार ३०० रुपये किमतीचा दारूसाठा जप्त
हिंगणघाट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात पोलिसांनी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करीत १३ हजार ३०० रुपये किमतीचा देशी दारुचा साठा जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाला आहे.प्राप्त माहितीनुसार पोलिसांना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी जाऊन धाड टाकली असता याठिकाणी १३ हजार ३०० रुपये किमतीचा देशी दारू साठा आढळून आला यासंबंधी मुद्देमाल जप्त करून हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.