नगर–मनमाड राज्य महामार्गावर भरधाव वेगात आलेला मालवाहतूक ट्रक राहुरी शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या टपऱ्या व दुकानांमध्ये घुसल्याची घटना आज शुक्रवार, दि. २२ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.