दारव्हा: बिजोरा गावात अजूनही उघड्यावर अंत्यसंस्कार; बहुजन मुक्ती पार्टीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दारव्हा तालुक्यातील बिजोरा गावात आजही स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मृतदेहांचा अंतिम संस्कार शेतात किंवा मोकळ्या जागेत करावा लागत आहे. प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे गावकऱ्यांना मरणानंतर ही यातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीचे दिग्रस विधानसभा प्रभारी बिमोद मुधाने यांनी केला आहे.