चाळीसगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उराशी बाळगून कॉलेजला गेलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.