सप्तशृंगगड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या इनोव्हा कारचा अपघात झालाय. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन कार (एम.एच.१५ बी.एन.०५५५) दरीत खाली कोसळली. गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला असून दर्शन घेऊन परतताना हा अपघात झाल्याने कारमधील ६ ते ७जण दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरू आहे पण १००० फूट खोल दरी असल्याने अडचणी येत आहेत