वर्धा: राष्ट्रीय लोकअदालत 13 डिसेंबर रोजी:राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून निकाली काढण्याचे आवाहन
Wardha, Wardha | Nov 18, 2025 न्यायालयातील तडजोडीस पात्र प्रलंबित तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांचे सहमत, आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी दि. 13 डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे ठेवून निकाली काढावी, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड तसेच जिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ए.एस.एम.अली यांनी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास केले आहे.