हिंगणघाट:शहरातील प्रभाग क्रमांक ९ (अ गट) तसेच प्रभाग क्रमांक ५ (अ व ब गट) साठी होणाऱ्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज हिंगणघाट येथील उपविभागीय कार्यालयात ईव्हीएम प्रिपरेशनची प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आकाश अवतरे यांनी दिली आहे.या निवडणुकीत एकूण तीन नगरसेवक पदांसाठी मतदान होणार असून, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दिनांक २१ रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. मतदानासाठी शहरातील एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.