यवतमाळ: शहरातील शाम टॉकीज परिसरातून चोरी प्रकरणातील आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना 30 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीवरून पथकाने चोरी प्रकरणातील आरोपी राजेश संतोष शिंदे वय 21 राहणार आठवडी बाजार परिसर यवतमाळ यास शाम टॉकीज जवळून ताब्यात घेऊन त्याच्याकडून विविध गुन्ह्यातील चोरीतील 96 हजाराच्या मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाही करिता अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.