चोपडा: सांगवी बुद्रुक येथे रस्त्यात रिक्षा लावल्याच्या कारणावरून वाद,एकाला ठार मारण्याची धमकी, यावल पोलीस ठाण्यात तक्रार
Chopda, Jalgaon | Nov 19, 2025 सांगवी बुद्रुक या गावात हमीद तडवी वय ६३ यांच्या घराचे काम सुरू आहे त्यांनी बांधकामाचे सामान रिक्षातून आणले आणि ते उतरवत होते. तिथे दुचाकीद्वारे शरीफ तडवी हा आला व त्याने रिक्षा बाजूला करा असे सांगून वाद घातला आणि या वादातून त्यांनी त्यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.