रोहित पवारांना यांना माजी मंत्री थोरातांचा स्पष्ट टोला जामखेड नगरपरिषद निकालानंतर काँग्रेसला ‘बी टीम’ म्हणणाऱ्या रोहित पवार यांच्यावर थोरातांनी अप्रत्यक्ष पण तीव्र टीका केली. “आम्ही आधीच सांगितले होते की जामखेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घ्या. तिथे नेतृत्वाविरोधात तीव्र नाराजी होती. विधानसभा निवडणुकीतील नाराजीही होती. निवडणूक लढताना तडजोड करावी लागते, सर्वांना सोबत घ्यावे लागते. हा आग्रह मी केला होता, पण तो मान्य झाला नाही.