महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व आनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 13 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1904 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण 8265. प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे, 138 एन.आय. अॅक्टच्या प्रकरणांचा समावेश होता.