श्रीकृष्ण मंदिरातूनही दानाचा डबा चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. डब्यात चार हजार रुपये होते. येथील एचडीएफसी व महाराष्ट्र बँकेच्या मधोमध माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा यांच्या बंगल्यासमोर हे मंदिर आहे भुतडा कुटुंबात दुःखद प्रसंग घडल्याने मंदिराच्या दरवाजाला कुलूप होते. त्याआधी शेजारी राहणारी महिला दररोज पहाटे येऊन पूजाअर्चा व स्वच्छता करत असल्याने मंदिर उघडेच असायचे