कुही: साळवा शेतशिवारात वाघाने केली गोऱ्याची शिकार
Kuhi, Nagpur | Jan 1, 2026 ग्रामीण भागात असलेल्या साळवा शेतशिवारात वाघाने गोऱ्याची शिकार केल्याची घटना साळवा शेतशिवारात उघडकीस आली. याबाबत चे वृत्त असे की शेतकरी सोनू मेश्राम यांनी शेतात आपली जनावरे शेतावर बांधली होती. सकाळी शेतकरी शेतात गेले असता गोरा रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आला. आजूबाजूला पाहणी केली असता वाघाच्या पावलांचे ठसे उमटून दिसले. वाघाने गोऱ्याची शिकार केल्याचे लक्षात आले.घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.